महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :बिदाल
माण तालुक्यात जरी दुष्काळ असला तरी या भागातील शेतकऱ्यांची कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे शेती क्षेत्रातील प्रगती ही उल्लेखनीय आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करत मत्स्यव्यवसाय व्यवसाय व पशुसंवर्धन व्यवसायाकडे वळले पाहिजे असे मत बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या समन्वयक सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले.माण तालुक्याच्या एक दिवसीय दौऱ्यावर असताना व्यक्त केले.
माण तालुक्यातील जाधववाडी, बोधे शिंदी खुर्द , भांडवली, बिदाल सोकासन, दहिवडी या गावांमधील शेतकऱ्यांच्या भेटी देऊन संवाद साधला यावेळी पाणी फाउंडेशनचे समन्वयक अजित पवार ,रावसाहेब देशमुख ,भालचंद्र पोळ,रुपेश कदम,,सचिन खलाटे आदी मान्यवर उपस्थित होते
सुनंदाताई पवार बोधेगावच्या भेटीच्या वेळी म्हणाल्या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जास्तीत जास्त प्रयोग करून उत्पन्न वाढवले पाहिजे .सध्याच्या कोरोनाच्या संकटात देशाला फक्त शेतकरीच जगवू शकतो . शेतकऱ्यांनी छोट्या पिकाचे फळबागाचे नियोजन व्यवस्थित करून बाजारभावाची सुद्धा नियोजन करणे गरजेचे आहे. शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर हा कमी झाला पाहिजे. या भागातील शेतकऱ्यांनी फळबाग बटाटा ,कांदा, डाळिंब, वाटाणा अशा मागण्या असणाऱ्या पिकांकडे वळले पाहिजे त्याच सोबत पशुसंवर्धन व मत्स्यपालन हा सुद्धा जोड व्यवसाय करणे गरजेचे आहे त्याच्यासाठी योग्य प्रशिक्षण व सरकारच्या योजनांची माहिती घेणे गरजेचे आहे प्रत्येक गावातील महिलांनी गावात छोटे-छोटे बचत गट करून संघटित झाले पाहिजे त्यातून वेगवेगळे लघु उद्योग सुरू करणे महत्वाचे आहे या माण तालुक्यातील शेतकरी हा कष्टकरी असल्यामुळे या भागांमध्ये पुढील काळात शेती क्षेत्रातील बदल हे उल्लेखनीय आहेत.
या एक दिवसीय भेटीच्या दरम्यान जाधववाडी, परकंदी, बोधे, शिंदी खुर्द ,भांडवली, बिदाल या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,तलाठी ,ग्रामसेवक, कृषी अधिकारी व गावकरी उपस्थित होते