
मसूर गावठाण संतोषी माता मंदिराजवळील घरे फोडून त्या घरातील रहिवाशांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली असून, ते दवाखान्यात दाखल आहेत. मसुर शिवाजी विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डोळस यांच्या घरातील गेटची कडी उचकटण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे.
भिसे नावाच्या एका तरुणाने विचक्षणला प्रतिक्रिया देताना सांगितले, की तो रात्री बाहेर गेला असताना, दोन अनोळखी व्यक्ती एका घराची कडी कशाने तरी घासत होते. त्याला पाहताच तया चोरांनी तेथून पळ काढला. तर त्याच्या शेजारच्या घरातील भांडी चोरट्यांनी फेकल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी शोध कार्य करणारे श्वान आणून तपास सुरू केला आहे. पोलिस अधिकारी गोरड हे तपास करीत असून, शोध कार्यास वेग आला आहे. या चोरट्यांचा छडा लावण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलिस करत आहेत. अजूनतरी कोणतीही आर्थिक हानी झाल्याची माहिती नाही.






















