महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (मायणी) : मंगेश भिसे
ग्रामीण भागात सध्या कोरोणाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून बहुतेक रुग्ण वेळेवर ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्यामुळे दगावत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे आपल्या भागातील एक ही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावता कामा नये या विचाराने राजकारणापेक्षा समाजकारणाला व माणुसकीला महत्त्व देणारे हरणाई उद्दोग समूहाच्या माध्यमातून रणजितसिंह देशमुख यांनी निमसोड येथील आरोग्य केंद्राला ऑक्सीजन मशीन उपलब्ध करून दिली यावेळी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका पाटील धनाजीराव देशमुख निलेश घार्गे, धनंजय जवंजाळ ,प्रताप माने, ए जे कुंभार, जी व्ही जाधव ,गणेश निकाळजे व इतर स्टाफ उपस्थित होता .
ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत असून या भागातील रुग्णांना लवकर ऑक्सिजन बेड उपलब्ध होताना दिसत नाही जो पर्यंत रुग्णाला ऑक्सिजन बेड मिळत नाही तो पर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात ढे उपचार मिळू शकेल व रुग्णाला आपला जीव गमवावा लागणार नाही .याच उद्देशाने या ऑक्सिजन मशिनची व्यवस्था केल्याचे रणजितसिंह देशमुख यांनी सांगितले
या कर्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश घार्गे यांनी केले तर आभार धनाजीराव देशमुख यांनी मानले