पृथ्वीराज चव्हाण : विराट चव्हाणच्या कुटुंबियांचे आ. चव्हाण यांच्याकडून सांत्वन
कराड : बुधवार पेठेतील विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट दिली. तसेच पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 2 वर्षात अश्या 11 घटना घडल्या असल्याच्या तक्रारी बाबांना उपस्थित नागरिकांनी केल्या, यावर आ. चव्हाण यांनी चिंता व्यक्त करीत मुख्याधिकारींना या गंभीर विषयाबाबत फोन करून जे ठेकेदार त्यांच्या कामात हलगर्जी करतात अश्याना ब्लॅकलिस्ट करावे अश्या सूचना दिल्या.
विराट चव्हाण चा मृत्यू झाला. त्यावेळी आ. चव्हाण बाहेरगावी होते, काल शहरात येताच त्यांनी बुधवार पेठ येथील विराट चव्हाण याच्या घरी भेट देऊन, त्याच्या कुटुंबियांची विचारपूसकरित सांत्वन केले. पालिकेच्या हलगर्जी पणामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे उपस्थित नागरिकांनी बाबांच्या निदर्शनास आणले. नागरिकांच्या तक्रारीबाबत पालिकेने सतर्क असण्याची गरजही यावेळी आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, रमेश वायदंडे, ऋतुराज मोरे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे आदिसह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.