महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सातारा दि. 6 : कोयना धरणात आज 60.53 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून त्यांची टक्केवारी 60.45 इतकी आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 202 नवजा येथे 245 व महाबळेश्वर येथे 183 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीपातळी टी.एम.सी.मध्ये व टक्केवारी कंसात पुढील प्रमाणे. धोम- 6.07 (51.91), धोम-बलकवडी- 2.77 (69.92), कण्हेर- 5.70 (59.44), उरमोडी- 7.13 (73.87), तारळी- 3.34 (57.17), निरा-देवघर 4.21 (35.93), भाटघर- 11.45(48.72), वीर – 4.35 (46.26).