महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :शहाजीराजे भोसले (इंदापूर )
इथेनाॅलची मागणी बाजारपेठेत वाढत असल्याने कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने इथेनाॅलची साठवणूक ३० टक्क्यांनी वाढवण्याच्या निर्णय घेण्यात आल्याची माहिती माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना दिली.
कर्मयोगी कारखान्याचे स्थळावर ७.५ लाख लिटर क्षमतेच्या ३ टाक्यांचे भुमिपूजन हर्षवर्धन पाटील , उपाध्यक्ष पद्मा भोसले यांच्या हस्ते सोमवार दि. १३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले यावेळी कारखान्याचे सर्व संचालक , अधिकारी व सभासद शेतकरी उपस्थित होते.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की , केंद्र सरकारच्या धोरणानुसार इथेनाॅलची वाढती मागणी लक्षात घेऊन सध्या कारखान्याकडे असलेल्या ३० हजार लिटर क्षमतेच्या प्रकल्पाची विस्तारवाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. भविष्यात आसवणी प्रकल्पाची ही वाढ करणार असल्याचे सांगितले .या संदर्भात नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत बैठक झाली असल्याचे पाटील यांनी सांगितले.