एनकूळ ता. खटाव जि. सातारा या ठिकाणी वंजारी सेवा संघाची मोठी विभागीय बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत शैक्षणिक व सामाजिक कार्यात अनमोल योगदान देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोधवडे ता.माण जि.सातारा येथील उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे व सुचिता सतेशकुमार माळवे या दोघाही सपत्नीक प्राथमिक शिक्षक दांपत्याचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन मातबगार अशा अनेक मान्यवरांच्या ऐतिहासिक साक्षीने उचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या शुभ प्रसंगी सतेशकुमार माळवे यांनी भारताचे माजी ग्रामविकास मंत्री बहुजन समाजाचे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला व समाजातील हुंड्यासारख्या अनेक अनिष्ट समाज विघातक रूढी , अंधश्रद्धा आणि परंपरा यावर त्यांनी आपल्या भाषणातून चौफेर असे शाब्दिक फटकारे मारले.समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या वाईट गोष्टींचा समूळ नाश झालाच पाहिजे.यासाठी त्यांनी अतिशय पोट तिडकीने आपल्या तेजस्वी वाणीत उपस्थितांच्या हृदयाला मंत्रमुग्ध करणारे प्रभावी असे समाज प्रबोधनपर भाषण केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या मध्ये वंजारी सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष व जिल्हा परिषद साताऱ्याचे माजी समाज कल्याण समिती सभापती मानसिंगराव माळवे, ओबीसीचे महाराष्ट्र राज्य समनवयक व राज्य आरोग्य संघटना कार्याध्यक्ष अरुण खरमाटे,वंजारी सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष सुधाकर मुंडे,प.महाराष्ट्र उपाध्यक्ष अँड सुनील गंबरे, संपर्क प्रमुख प्रकाशशेठ खाडे,सातारा मध्यवर्ती सह.बँक साताराचे माजी संचालक व एनकूळ गावचे माजी सरपंच प्रा.अर्जुन खाडे,प्राथमिक शिक्षक सह.बँकेचे माजी चेअरमन मा.ए.खाडे, प्रा.सदाशिव खाडे,एनकूळ विकास सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन रावसाहेब हांगे, वंजारी सेवा संघाचे राज्य संघटक अरुण खरमाटे,उद्योगपती व युवाध्यक्ष प्रतिकशेठ खाडे,शहाजी खाडे,सतीश ठोंबरे,अंकुश खरमाटे,यशवंत खाडे,भिमराव चोले, कणसेवाडी उपसरपंच अनिलभाऊ खाडे, प्राथमिक शिक्षक सह.बँक संचालक आर डी खाडे,माण तालुका अध्यक्ष धैर्यशील खाडेपाटील, प्रा. विलास खाडे,रंजना सानप,सुदाम हांगे,संपत खाडे,नवनाथ खरमाटे,कबीर खरमाटे,राजेंद्र खाडे आदि बहुसंख्य मान्यवर मंडळी हया कार्यक्रमासाठी उपस्थित होती.