फलटण : श्री स्वामी समर्थ एज्युकेशन सोसायटीचे बि जे इंग्लिश स्कूलयेथे दिनांक .८ मार्च रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त प्रशाले मधे “BJ’s Master Mother Chef” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मधे अनेक महिला पालकांनी उत्स्पूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये पराठा, पुलाव , मिठाई, शीतपेय इ. पाककृती सादर करण्यात आल्या. परीक्षकांनी चव, सजावट, पौष्टिकता , सादरीकरण यानुसार त्याचे गुणांकन करून विजेत्या महिला स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू व पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच उपस्थित महिलांनी कोडी व उखाणे या मधे उस्पूर्त पणे सहभाग नोंदवला.
याबरोबर विद्यार्थिनी नी भारतातील कर्तृत्ववान स्त्रियांविषयी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती. विजया रणवरे व सौ. हुस्नाबनो भिलावडे या उपस्थित होत्या. उपस्थित सर्व महिला पालकांचे स्वागत व सत्कार सौ. आर. आर. जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकांनी योगदान दिले.




















