सातारा: साहित्य कलावर्तक मंडळी सातारा यांच्या वतीने शनिवार दिनांक 27 रोजी चित्रातले चित्र रंग या विषयावर ज्येष्ठ चित्रकार अभिजीत शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. यापूर्वी जेष्ठ रंगकर्मी तुषार भद्रे यांनी नाट्यरंग या विषयावर पहिले पुष्प सादर केले होते. त्यांच्या व्याख्यानाला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला होता. चित्रकार अभिजीत शिंदे यांचे व्याख्यान दीपलक्ष्मी सभागृह कन्या शाळेमागे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या व्याख्यानात ते चित्रकला म्हणजे काय? रंग कशाला म्हणायचे? चित्र निर्मितीची प्रक्रिया कशी असते? सर्जनशीलता हा एक प्रवास आणि चित्र कसे पाहावे याव यासारख्या मुद्द्यांवर विषय विस्तार करणार आहेत.
या कार्यक्रमास कलारसिकांनी अगत्याने यावे असे आवाहन साहित्यकलावर्तक व यांनी केले आहे.