महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
कोल्हापूर जिल्ह्यात 750 बेड वाढीव क्षमतेची कोविड रुग्णालये तात्काळ उभी उभी करण्याची खा. माने यांची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोऱोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात 750 बेड वाढवून कोविड रुग्णालये तात्काळ उभी करावीत अशा आशयाचे पत्र खा. धैर्यशील संभाजीराव माने यांनी कोल्हापुरचे जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
पत्रात म्हटल्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ ,शाहूवाडी, पन्हाळा या तालुक्यांमध्ये एकूण 2629 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 218 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे खासगी रुग्णालयांची क्षमता संपलेली आहे. बेड मिळणे मुश्किल झाले आहे. रुग्णालयातील क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची संख्या कमी आहे. त्यामुळे रुग्णांचे मृत्यू होत आहेत. त्यासाठी इचलकरंजी नगरपालिका, वडगाव नगरपरिषद आणि इचलकरंजी डॉक्टर असोसिएशन यांनी सुसज्ज कोविड रुग्णालये उभारणी बाबत मागणी केलेली आहे.
त्यानुसार वडगाव ता. हातकणंगले येथे 100., इचलकरंजी येथे 250 ; पन्हाळा व शाहुवाडी तालुक्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी 200 व शिरोळ तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी 200 बेडची अशी सुसज्ज रुग्णालये उभा करण्यात यावीत असे त्या पत्रात सूचित करण्यात आले आहे.