रासायनिक खतांचा क्रुत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये याची दक्षता क्रुषी अधिकार्यांनी घ्यावी साजिद मुल्ला युवा प्रदेशाध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : हंगाम तोंडावर आला आहे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे शेताची मेहनत करून तयार आहे पंचायत समिती मध्ये सवलतीच्या दरामध्ये बि बियाणे मिळत आहेत गरजू शेतकऱ्यांनी योग्य ती कागदपत्रे पंचायत समिती मध्ये शेती विभागामध्ये जमा करून योजनेचा लाभ घ्यावा अधिकारी जर शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असतील तर आमच्या स्टाईल ने अधिकार्यांना धडा शिकवू रासायनिक खतांचा क्रुत्रिम तुटवडा निर्माण करून दुकानदार शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहेत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील क्रुषी अधिकार्यांनी सावधान बाळगावी रासायनिक खतांचा क्रुत्रिम तुटवडा निर्माण करणार्यां दुकानदारांच्या वर क्रुषी विभागाने कडक कारवाई करावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील क्रुषि विभागाच्या कार्यालयावर आंदोलन करणार असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे
| ReplyForward |






















