महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / मायणी :
वाघ्या मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मारुती साठे सर यांच्या नेतृत्वाखालील माननीय राजू घोलप यांची वाघ्या मुरळी परिषद खटाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाली. त्यावेळी वाघ्या मुरळी परिषदेचे जिल्ह्याचे अध्यक्ष शिंदे साहेब हजर होते तसेच सचिव कुलकर्णी काका आणि जनता क्रांती दलाचे पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष विकास सकट हेदेखील हजर होते. यावेळी राजू घोलप यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.तसेच संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल आणि या कार्यक्रमाला पाठिंबा दिल्याबद्दल जनता क्रांती दलाचे युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विकास सकट यांचाही सत्कार करण्यात आला.

या संघटनेचे महाराष्ट्रातील लोक लोककला म्हणजे जागरण गोंधळ जागरण तसेच विविध परंपरागत कला जपणार्या कलाकारांना पेन्शन चालू करणे तसेच त्यांच्या अडचणी सोडवणे याचे काम परिषदेच्या माध्यमातून हाती घेतले आहे त्यांच्या वतीने जिल्ह्यातील प्र महाराष्ट्रातील प्रत्येक प्रत्येक तहसीलदार कार्यालयाला लोक कलाकाराच्या जीवनातील अडचणी संदर्भात निवेदन देऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.
याप्रसंगी मान खटाव तालुक्यातील जागरण गोंधळ चालवणाऱ्या चालवणाऱ्या पार्टी प्रमुख सहित विविध पारंपारिक कला जपणारे सर्व कलाकार उपस्थित होते. प्रकारांच्या समस्या अडीअडचणी सरकारसमोर मांडण्याचा आणि त्या सोडवण्याचा राजू घोलप यांनी आपल्या पदाचा पुरेपूर उपयोग करणार आहोत असे आश्वासन दिले. तळघरातील लोककलावंतांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अविरत कार्य करेन असे देखील ते यावेळी म्हणाले






















