राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत आर्या साळुंखेचे यश कौतुकास्पद – श्रीरंग काटेकर स्कॉलरशिपसाठी निवड, सुखात्मे स्कूलमध्ये सत्कारलिंब- राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत (एन.टी.एस ) आर्या साळुखेने प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले ते गौरीशंकर ङाॅ.पी व्ही सुखात्मे इंग्लिश मीडियम स्कूल लिंब येथे सुखात्मे स्कूलची माजी विद्यार्थिनी आर्या साळुंखेच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी स्कूलच्या प्राचार्या डॉ.नवनीत पटेल, डॉ. प्रगती साळुंखे ,पालक प्रतिनिधी फिरदोस मुजावर आदींची प्रमुख उपस्थिती होती.श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की संपूर्ण सातारा जिल्ह्याचा नावलौकिक आर्या साळुंखेने वाढविला आहे अथक परिश्रम जिद्द चिकाटीच्या जोरावर तिने हे यश प्राप्त केले आहे भविष्यातील संशोधक म्हणून त्याच्याकडे समाज आशेने पाहातआहे .प्राचार्य डॉ.नवनीत पटेल म्हणाल्या की आर्याच्या यशाने डॉ. पी.व्ही सुखात्मे स्कूलमधील विद्यार्थी सुखावले आहेत तिच्यापासून येथील विद्यार्थ्या निश्चितच प्रेरणा घेतील तिने स्कूलचा नावलौकिक वाढविला आहे तिचा आम्हाला सार्थअभिमान आहे.सत्कारमूर्ती आर्या साळुंखे म्हणाले कि ध्येयवादी वृत्तीने जीवनात वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते यशासाठी सकारात्मकतेची कास धरा तसेच जीवनात नेहमी आशावादी राहा ताणतणावापासून दूर राहून मनापासून आनंददायी वातावरणात अभ्यास केल्यास कठीण काळात यश सहज प्राप्त होते.प्रारंभी आर्या साळुंखेच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले या निमित्ताने आयोजित महिला पालक मेळाव्यातील महिलांचे फिरदोस मुजावर यांनी पुष्प देऊन स्वागत केले.प्रास्ताविक अंजना गोसावी यांनी केले सूत्रसंचालन व आभार शिल्पा भोसले यांनी केले.
– ध्येयवादी दृष्टिकोन ठेवा …….कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे लागते आपली क्षमता ओळखून प्रत्येकाने आपल्या जीवनाचा मार्ग शोधला पाहिजे यशस्वी होण्यासाठी मनापासून प्रयत्नाची पराकाष्टा केली तरच यश मिळते जीवनात सर्व काही शक्य आहे फक्त आपली इच्छाशक्ती जागृत व्हावे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा बाबत विद्यार्थ्यांमध्ये अनेक समज व गैरसमज आहेत ते आपण दूर केले पाहिजेत आपण जिद्दीने पुढे आलो तर यावर आपण सहज मात करू शकतो जीवनात आनंदीवृत्ती ठेवून जगा निरोगी रहा मन प्रसन्न ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करा त्याचे ओझे वाटून शिकू नका स्पर्धेच्या युगात स्वतावर विश्वास ठेवा इतराशी तुलना करू नका प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुणसंपन्नता असते असा संदेश देत आर्या साळुंखेने विद्यार्थ्यांना प्रेरित केले या परीक्षेला संपूर्ण देशभरातून दहा लाख विद्यार्थी बसले होते त्यामध्ये दोन हजार विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी निवड झाली त्यामध्ये आर्या सांळुखेचा समावेश आहे.
आर्या साळुंखेचा सत्कार करताना श्रीरंग काटेकर समावेत डॉ.नवनीता पटेल, डॉ. प्रगती साळुंखे