शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महेश लोखंडे यांचा सन्मान
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
वडगाव हवेली, ता कराड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तंत्रस्नेही शिक्षक महेश लोखंडे यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित केलेल्या शिकू आनंदे अर्थात लर्न विथ फन कार्यक्रमात योगासन घटकाचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल तसेच शैक्षणिक क्षेत्रात तंत्रस्नेही म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांचेहस्ते त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

पंढरपूर महेश लोखंडे यांचा शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पंढरपूर येथे ५ वे राष्ट्रीय शिक्षक संमेलन संपन्न झाले. ५ व्या राष्ट्रीय संमेलनामध्ये दिनांक १४ व १५ मे रोजी पंढरपूर येथे महेश लोखंडे यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करणेत आले. प्राथमिक शिक्षण संचालक मा. दिनकर टेमकर साहेब , उपसंचालक मा.डॉ. नेहा बेलसरे मॅडम ज्येष्ठ अधिव्याख्याता डायट पुणे मा.प्रभाकर क्षीरसागर साहेब , ज्येष्ठ अधिव्याख्याता डायट परभणी माननीय डॉ.गीतांजली बोरुडे मॅडम, दिल्ली गव्हर्नमेंट मेंटॉर टीचर नवी दिल्ली मा. मनु गुलाटी मॅडम,मा. इम्रान खान अँप गुरु राजस्थान, शिक्षण अभ्यासक केरळ विधु नायर सर , एटीएमचे राज्य संयोजक विक्रम दादा अडसूळ , सहसंयोजक ज्योतीताई बेलवले , नारायण मंगलारम , ज्ञानदेव नवसरे यांच्या उपस्थितीत सन्मान झाला. लोखंडे यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्यामुळेकराड तालुका शिक्षण विभागाचा नावलौकिक वाढला आहे त्यामुळे शिक्षण विभागातील सर्वच शिक्षक अधिकारी पदाधिकारी यांच्याकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. वडगाव हवेली शाळेत सध्या उपशिक्षक म्हणून कार्यरत असणारे महेश लोखंडे हे उत्कृष्ट तंत्रस्नेही म्हणून ओळखले जातात. त्यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यातील काम उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना तालुका तसेच जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारानेही सन्मानित केलेले आहे.त्यांना एशियन एज्युकेशन अॅवार्ड,ह्युमॅनटेरियन एक्सलन्स अॅवार्ड,रोटरी नेशन बिल्डर अॅवार्ड,एज्यु काॅन्क्लिव्ह अॅवार्ड ,लातूर राज्यस्तरिय आदर्श शिक्षक अॅवार्ड असे पुरस्कार मिळालेले आहेत.






















