महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :म्हसवड
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने लाॅकडाऊन सर्व व्यापार दुकाने हाॅटेल खाणावळी बंद झाल्याने विविध खाजगी हाॅस्पिटल मध्ये विविध आजाराने उपचार घेणारे उपासमारीचा सामना हाॅस्पिटल, वेडसर, निराधार ,बेवारस फिरस्ती , वृद्ध करत असताना
माणुसकीच्या भावनेतुन पत्रकार एल के सरतापे यांनी सुरु केलेला अन्नदानाचा उपक्रम आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या माध्यमातुन लोकसहभाग वाढत गेला या ग्रुपने भुकेल्याची भुक भागवत दोन घास देवून माणुसकी जपत साडे तीन महिन्यात १हजार २२ लोकांना दोन वेळचे जेवन देण्याचे मोठे काम लाॅकडाऊनच्या काळात करणारे खरे कोव्हीड योध्दा आम्ही म्हसवडकर ठरले असल्याचे गौरवउद्गार जनकल्याण समितिचे केदार कुलकर्णी यांनी म्हसवड येथे काढले
लाॅकडाऊनच्या काळात आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या दोन घास सुखाचे या बारा जनाच्या टिमला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिति सातारा जिल्हा यांचे वतीने कोव्हीडी योध्दा हा पुरस्कार देण्यात आला यावेळी या समीतीचे प्रचार प्रमुख केदार कुलकर्णी, समीतीचे जिल्हा कार्यवाहक मुकूंद आफळे, चंद्रकांत धुळप, म्हसवड शाखा प्रमुख रामचंद्र नरळे, अॅड अभिजित केसकर, बंटी खाडे, भोरे, प्रितम तिवाटणे सह आम्ही म्हसवडकर टिमचे एल के सरतापे, कैलास भोरे, राहुल मंगरुळे,संजय टाकणे, अॅड अभिजित केसकर, चंद्रकांत गुरव, प्रितम तिवाटणे, खंडेराव सावंत, सचिन मेनकुदळे प्रशांत दोशी यांचा कोव्हीड योध्दा हां पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर दोन घास सुखाचे या टिमचा गौरव रत्नागिरी येथील ईगल फाउंडेशनच्या वतीने तरुण भारतचे म्हसवड प्रतिनिधी एल के सरतापे यांना कोव्हीड योध्दा हां पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
यावेळी एल के सरतापे यांनी सांगितले कि लाॅकडाऊनच्या काळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पासुन मी जरी हा उपक्रम सुरु केला असला तरी मला पहिले सहकार्य कैलास भोरे यांनी केले आणि नंतर हा उपक्रम लोकसभागाने वाढत गेला बारा ते पंधरा कोव्हीड योध्दा कोरोनाला न भिता भुकेल्याची भुक भागवत होता ईगल फाउंडेशन रत्नागिरी यांनी जरी कोविड योध्दा म्हणुन माझा गौरव केला असला तरी हा बहुमान माझ्या ऐकट्याचा नसुन तो तमाम म्हसवडकरांचा आहे
प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे आम्ही म्हसवडकर यांनी सुरु केलेला दोन घास सुखाचे हां उपक्रम म्हणजे फिरस्ती वेडसर वृध्दांना जिवनदान ठरणारा आहे
तहसीलदार बाई माने लाॅकडाऊनच्या काळात हाॅस्पिटल पासुन रस्त्यावर फिरणारे यांना शोधून त्यांच्या पोटात दोन घास घालणारे लाॅकडाऊनचे खरे योध्दा आहेत
सपोनि गणेश वाघमोडे रस्त्यावरील भिकारी आसो किवां दवाखान्यातील रुग्ण यांना दोन वेळचे पोटभरुन जेवन देण्याची या ग्रुपची रात्रीची, पावसातील धडपडीने अनेकांना जगण्याची नवसंजिवनी देण्याचे काम केले
नगराध्यक्ष भगतसिंग विरकर आम्ही म्हसवडकर ग्रुपच्या दोन घास सुखाचे या मुळे लाॅकडाऊनमुळे हाॅस्पिटल, आरोग्य केंद्रातील नर्सैस, पोलिस कर्मचारी, होमगार्ड , वेडसर, फिरस्ती, अनाथ व वृद्ध यांना मोफत जेवन देण्याचा उपक्रमाने या ग्रुपने म्हसवडचे नांव लौकीक केले त्याच्या या प्रामाणिक कामाला शहराचा प्रथम नागरीक म्हणून सलाम करतो.