अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेने आबालवृद्धांसह नागरिक हैराण
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा दि. २६ मार्च : राज्यातील वाऱ्यांचा वेग मंदावल्याने पुन्हा एकदा तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सोमवारपासून (२८ मार्च) राज्यभरातील वातावरण कोरडे होणार असून उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यभरातील बहुतांश शहरांमधील कमाल सरासरी तापमान ४० ते ४१ अंशांवर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या आठवडय़ात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले होते. परिणामी राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरणासह वाऱ्याचा वेग वाढल्याने कमाल तापामानात किंचित घट झाली होती.





















