महाराष्ट्र न्यूज़ फलटण प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले :
सांगली जिल्हा म्हंटलं की बहुतांश लोकांना द्राक्ष शेतीच आठवते. कारण त्या ठिकाणचे वातावरणही द्राक्ष शेतीसाठी अनुकूल आहे. नवीन काहीतरी प्रयत्न करणारे लोक तसे कमीच, पण मिरज तालुक्यातील मालगाव येथील मनोज मानगावे हे नाविण्यपूर्ण कल्पनेतून आधुनिक शेतीच्या बळावर कोठ्याधीश झाले आहेत. त्यांच्या ग्रीनहाऊस मधील अनेक प्रकारांच्या जरबेराला भारतीय बाजारपेठेत अमाप मागणी आहे.
मनोज मानगावे पूर्वी ग्रीनहाऊस मध्ये रोज़गारी वर काम करायचे. राहुरी येथे जरबेरा ग्रीनहाऊस मधे काम करत असताना त्यांना खुप अनुभव मिळाला. मनोज मानगावे यांनी दोन-तीन वर्षांचा अनुभव घेऊन स्वतःचे ग्रीनहाऊस तयार करायचे ठरवले. सांगली जिल्हा मिरज तालुक्यातील मालगाव हे त्यांचे मूळ गांव त्यांनी स्वत:च्या गावी परतून ग्रीनहाऊस तयार केले. सुरुवातीला एक एकर मध्ये जरबेरा फुलांची लागवड केली. त्यामधून त्यांना भरपूर फायदा झाला. दोन-तीन वर्षें मार्केटचा अनुभव घेऊन त्यानी आता पाच एकर ग्रीनहाऊस तयार केले. कष्ट आणि उत्तम नियोजनाच्या बळावर त्यांनी भारतीय फुलांच्या बाजारपेठे मधे आपले वर्चस्व मिळवले आहे.
प्रगतशील उदयोजक मनोज मानगावे यांच्या समवेत कृषि महाविद्यालय पुणे चे विद्यार्थी कृषिदूत सचिन शांतिनाथ धामणे.