धामणेर ग्रामपंचायतीची कामगिरी उल्लेखनीय :पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील
महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : सातारा
कोरोना विषयी लोकांमध्ये प्रचंड भीती आहे तरी लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही प्रत्येकाने पुढे येऊन आपल्या आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे .धामनेर ग्रामपंचायतीची कामगिरी उल्लेखनीय आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन स्वतःचे लोकवर्गणीतून कोरोना सेंटर सुरू करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.श्री मारुती देव सामाजिक व ग्रामपंचायत धामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकवर्गणीतून कोरोना केअर सेंटरचे या वेळी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरपंच संजीवनी सुतार पोलीस पाटील जयवंत क्षीरसागर ,नंदराव कणसे, अशोक देसाई, अंजनी देशमुख ,प्रदीप क्षीरसागर ,अशोक देसाई ,सोमनाथ क्षीरसागर, शंकर पवार, सुरेश होवाळे, सुनील क्षीरसागर, सचिन शिरसागर , हरिश्चंद्र कणसे ,धनंजय गुजर व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर बोलताना म्हणाले गावामध्ये प्राथमिक शाळेच्या आवारामध्ये असणाऱ्या इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध केले आहेत तसेच लोकांसाठी करमणूक म्हणून दूरदर्शन देखील उपलब्ध केला आहे डॉक्टर यंत्रणादेखील चौवीस तास उपलब्ध असणार आहे. लोकांसाठी चहा व नाश्त्याची व गरम पाण्याची सोय सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे . आपल्याच गावांमध्ये उपचार घेताना लोकांना आनंद वाटला पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत.
कोरोनाच्या संकटात मध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीने धामणेर ग्रामपंचायतीचा आदर्श घेऊन प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी करून स्वयंचलित होणे आवश्यक आहे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे :शेखर सिंह जिल्हाधिकारी सातारा