महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी/सातारा :
धायगुडे करिअर अकॅडमी सातारा यांच्या वतीने पोलीस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी सर्व विषयांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आल्याची माहिती अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अनिल धायगुडे यांनी दिली.
या मोफत कार्यशाळेत 7 फेब्रुवारी रोजी बुद्धिमत्ता या विषयावर नितीन महाले, 8 फेब्रुवारी रोजी राज्यघटना व पंचायत राज या विषयावर सुभाष पवार, 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर शिवाजी पवार, 10 फेब्रुवारी रोजी सामान्य विज्ञान या विषयावर अमोल साळवे, 11 फेब्रुवारी रोजी चालू घडामोडी या विषयावर टॉपर 777 चालू घडामोडीचे लेखन इद्रिस पठाण, 12 फेब्रुवारी रोजी अर्थशास्त्र या विषयावर सतीश शिंदे, 13 फेब्रुवारी रोजी मराठी या विषयावर भगवान मस्के, 14 फेब्रुवारी रोजी आधुनिक भारताचा इतिहास या विषयावर संचालक चैतन्य रणपिसे यांचे मार्गदर्शन होणार आहे.
शनिवारी गणित या विषयावर नितीन महाले यांच्या मार्गदर्शन कार्यशाळेस 300 पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. या अगोदरही अकॅडमीच्या वतीने मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या ॲकॅडमीतील बरेच विद्यार्थी विविध पदावर निवड झालेले आहे. याविषयीही मोफत मार्गदर्शन कार्यशाळा वेणूताई महिला बी.एड. कॉलेज, रविवार पेठ, पोवई नाका, सातारा या ठिकाणी सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आली असून या कार्यशाळेचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन धायगुडे करिअर ॲकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अनिल धायगुडे व चैतन्य रणपिसे यांनी केले आहे.