महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन…….
महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती च्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब यांना राज्यातील प्रत्येक जिल्हा कार्यकारणी च्या वतीने जुनी पेन्शन योजना कर्मचारी – शिक्षक यांना लागू करावी असे निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सातारा जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त कर्मचारी शिक्षकांचे व त्यांच्यावरील अवलंबितांचे निवृत्ती /मृत्यूनंतर चे भविष्य अंधकारमय करणाऱ्या DCPS/NPS योजनेतून मुक्ती देण्याबाबत सर्वच स्तरावरून मागणी होत आहे. छत्तीसगड,राजस्थान सारख्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याची सर्वत्र स्वागत होत आहे.
कर्मचारी शिक्षक संघटना सह अनेक सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी ही जुन्या पेन्शनचा आग्रह धरला आहे विधिमंडळात आणि विधिमंडळाला बाहेरही याबाबत सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटक असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जुन्या पेन्शन ची मागणी केली आहे. शीर्षस्थ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी आणि आपण सुद्धा जुनी पेन्शन साठी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.लक्षावधी कर्मचारी – शिक्षक आणि त्यांचे कुटुंबियांसाठी आधार असणारी जुनी पेन्शन,कुटुंब निवृत्ती वेतन आणि भविष्य निर्वाह निधी योजना पुरोगामी अशा महाराष्ट्र राज्यात तातडीने पुन्हा लागू करण्याचा निर्णय लगेच घ्यावा अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कडून आपणास कळकळीची विनंती करण्यात येत आहे.अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.या वेळी माजी जिल्हाध्यक्ष तथा निमंत्रित सदस्य शिक्षण समिती जि. प.सातारा श्री.शंकर देवरे,जिल्हा सरचिटणीस सातारा जिल्हा शिक्षक समिती तथा संचालक शिक्षक बँकचे संचालक किरण यादव, जावली तालुका शिक्षक समिती चे अध्यक्ष सुरेश चिकणे, सातारा जिल्हा शिक्षक समितीचे उपाध्यक्ष गजानन वारागडे, कोरेगाव तालुका शिक्षक समितीचे उपाध्यक्ष उदय घोरपडे, जावली तालुका शिक्षक समितीचे प्रसिद्धी प्रमुख शामराव जुनघरे,यासह तानाजी कुंभार,सुनिल शिंदेउपस्थित होते.