पुणे ता.०७ -: ” ध्यास फाउंडेशन ” या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन पूरग्रस्त भागातील एकूण ३०० कुटुंबांना अत्यावश्यक गोष्टींचे किट वाटप….
-सुनील निंबाळकर / पुणे प्रतिनिधी
यावर्षी अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांना फटका बसला , त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पाली, जुगाईवाडी व आटोळी (मोरगिरी) गावांचे देखील खूप नुकसान झाले.
अश्या परिस्थिमध्ये पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी ध्यास फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन पूरग्रस्त भागातील एकूण तीनशे कुटुंबांना अत्यावश्यक गोष्टींचे किट देऊन मदत केली.
या मदतीमुळे पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला व या मदत कार्यासाठी लाभार्थ्यांनी संस्थेचे आभार देखील मानले.
ध्यास फाऊंडेशन ही श्री. अदित्य यादव यांनी सुरू केलेली एक सामाजिक संस्था असून ती गेले चार वर्षे पुणे व सातारा येथे विविध सामाजिक कार्यात कार्यरत आहे.
ध्यास संस्थेचे संस्थापक श्री. आदित्य यादव यांनी या मदती कार्यामध्ये हातभार लावलेल्या सर्व देणगीदारांचे तसेच कार्यकर्त्यांचे आभार मानले व संपूर्ण महाराष्ट्रात विविध सामाजिक विषयांवर काम करायची ईच्छा दर्शविली.