महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्ष, कराड तालुका अध्यक्ष व प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्यावतीने तालुका अध्यक्ष या नात्याने आपले मन:पुर्वक आभार सतिश विष्णु पाटील यांच्या व्यक्त करण्यात आले.कराड नगरपरिषद, कराड सन 2020 ते 2022 सालामध्ये 5टक्के दिव्यांग कल्याण निधी 100 टक्के खर्च करून थेट दिव्यांग बांधवाच्या बँक खात्यात आर्थिक लाभ जमा केला त्यामुळे गोरगरिबांना व गरजु दिव्यांग बांधवाचा आनंद द्विगुणित झाला. यावर्षात नगरपालिकेत एकदाही दिव्यांग बांधव न येता कोणतेही हेलपाटे न मारता आपले कुशल व होतकरू अधिकारी वर्ग चिफ अर्कोन्टट रविढोणे तसेच समाज व बालकल्याण अधिकारी श्री गणेश जाधव सौ. रेपाळ मॅडम श्री. प्रमोद जगदाळे यांनी विशेष लक्ष घालून 100 टक्के निधी खर्च करण्यात आला त्यामुळे आपले व सर्व अधिकारी वर्गाचे मी व आमच्या राज्यव्यापी संघटनेकडून आपले आभार मानुन आपण केलेल्या बहुमोल कार्यसाठी अभिनंदन करण्यात आले.


















