महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
मालखेड ता.कराड येथे डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व कृष्णा बॅकेचे अध्यक्ष डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सदाशिव भोसले व युवराज पवार मित्र परिवाराच्यावतीने जिल्हा परिषद शाळा मालखेड येथील विद्यार्थ्याना शालेय साहित्य व खाऊ वाटप भारतीय जनता पक्षाचे कराड दक्षिण तालुका अध्यक्ष धनाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी धनाजीराव पाटील म्हणाले, की डॉ.अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम सदाशिव भोसले व युवराज पवार मित्र परिवाराच्यावतीने आयोजित केला आहे तो आदर्शवत आहे. वाढदिवसानिमित्त असे सामाजिक उपक्रम राबवले तर निश्चित आपण समाजाची सेवा करत आहोतयावेळी सदाशिव भोसले, उपसरपंच युवराज पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मोहिते, ग्रामपंचायत सदस्य भिमराव होवाळ, ग्रामपंचायत सदस्या निता माने,निवास लोकरे,बाजीराव माने , रणजित पवार, बळवंत लोकरे, शिवाजी सपकाळ,मोहन लोकरे, ओमकार पाटील, रामदास शिवदास,प्रणय लोकरे,प्रणाल पवार, विठ्ठल होवाळ,श्याम होवाळ, गणेश ठोंबरे,अशितोष पवारयावेळी सुत्रसंचलन युवराज पवार यांनी केले तर आभार मुख्याध्यापक कदम यांनी मानले.मालखेड येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना धनाजीराव पाटील, सदाशिव भोसले, युवराज पवार, व इतर मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते