महाराष्ट्र न्यूज जळोची प्रतिनिधी दिगंबर पडकर
शहरातील सूर्यनगरीतील कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कातील गुणवडी येथील एक तरुण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
काल रात्री 15 स्वॅब नमुने घेतले होते. त्यापैकी १४ निगेटिव्ह आले. सूर्यनगरीतील रुग्णाच्या संपर्कातील गुणवडी येथील १ तरुण पॉझिटिव्ह आला आहे .तसेच आज सकाळी इतर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व काही संशयित असे ३६ नमुने घेतलेले आहेत. त्याचा अहवाल प्रतीक्षेत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी सांगितले.शहरात दोन दिवसापासून लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






















