मेढा : राज्यात सत्ता कोणाचीही असुद्या जावलीच्या अस्मितेकरीता गेली . एका दशकांहून अधिक रेंगाळलेल्या बोंडारवाडी धरणाचा . प्रश्न आमदार म्हणुन मार्गी लावणार आहे.बोंडारवाडी धरणाबातीत ५४ गावातील शेतकऱ्यानंमध्ये गैरसमज पसरवु नका असे अवाहन साताराजावली विधानसभा मतदार संघाचे आमदार मेढा येथे आयोजीत पत्रकार परीषदेत केले . यावेळी ते म्हणाले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार याच्या माध्यमातुन बोंडारवाडी धरणाकरीता पाठपुरावा ठेवला आहे. धरणाच्या भितीरेषाबाबतीत बोंडारवाडी गावातील नागरीकानशी सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच इमारत रेषा निश्तितेचा प्रश्न मार्गी लागला आहे. बोंडारवाडी धरण हे ५४ गावांच्या लोकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.मात्र या बोंडारवाडी धरणाबाबतीत बंधारा होणार म्हणुन दिशाभूल करण्याचा जाणीव पुर्वक प्रयत्न सुरु असुन. हा दिशाभूल करणारी माहीती देवुन गैरसमज निर्माण करु नका असे अवाहन त्यानी यावेळी केल.
जावली तालुक्यांचा लोकप्रतिनीधी म्हनुन प्रामाणिकपणे मी सन २००९ पासुन बोंडारवाडी धरणाबाबतीत मी प्रयत्नशील आहे . महाराष्ट राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार याच्याकडुन बोडारवाडी धरनाची तत्वता मान्यता मिळवली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणत जास्ती जास्त फायदा धरनाला शेतकऱ्यांचा असायला हवा हाच माझा उद्देश माझा राहीला आहे . जावलीत बोंडारवाडी धरण तांत्रिक दृष्या अधिकार्यानकडुन अहवाल सादर करण्याचा मुद्दा मार्गी लावला जात आहे . लवकरच सर्व सर्वे पुर्ण होवुन धरणाचा अहवाल मार्गी लावला जाईल . बोडारवाडी धरणाकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी देखील युद्धपातळीवर प्रयत्न केले आहेत.
जावलीत बोंडारवाडी धरणाकरीता आपण कोणतीही दुसरी समिती तयार केली नसल्याची जाहीर माहीत पत्रकार परीषदेत आमदार शिवेंद्र राजे यांनी दिली . धरण कृती समितीचे अध्यक्ष मोहन कासर्डे आजही आपल्या बरोबर आहेत. ज्यांना बोंडारवाडी धरणाच्या पडद्यामागुन राजकारण करायचे आहे त्यानी राजकारण थांबवावे. बोंडारवाडी धरणाच्या उभारणीकरता भुतकाळात बोलावलेल्या मिटीगानकरीता मला लोकप्रतिनीधी म्हणुन सदैव डावलले गेले असल्याची खंत यावेळी त्यानी व्यक्त केली. मात्र जावलीच्या बोंडारवाडी धरण होण हात केद्रबिदुं मानुन मी सदैव प्रयत्नशील आहे. बोंडारवाडी धरणांचे कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी याच्याशी आजही संबंध चांगले असुन बोंडारवाडी धरणाला मार्गी लावण्याकरीता कोणताही दुजाभाव आपल्याकडुन होणार नसल्याची माहीती त्यानी पत्रकार परीषदेत दिली.
यावेळी समाजसेवक ज्ञानदेव राजणे , मेंढ्यांचे नगराध्यक्ष पांडुरंग जवळ , उपनगराध्यक्ष कल्पना जवळ , माजी सरपंच बडोपंत ओबळे , हरीभाऊ सपकाळ, अध्यक्ष रामभाऊ शेलार ,मोहन कासुर्डे, चेअरमन बेलोशे याच्यासह विविध गावाचे सरपंच यावेळी उपस्थित होते.