सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात गुढीपाडव्यानिमित्त मुंबई येथील कलाकारांचे भरतनाट्यम सादर होणार आहे. मुंबई येथील संस्कार अकादमी ऑफ फाइन आर्ट्स यांच्या वतीने सुप्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना नमिता गोदाजी यांच्यासह त्यांच्या शिष्या हा भरतनाट्यम चा नृत्यप्रकार सादर करणार आहेत.
शनिवारी गुढीपाडव्यानिमित्त 2 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात हा भरतनाट्यम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून या कार्यक्रमांमध्ये संस्कार अकादमीच्या देवश्री व्होरा, शिखा मेहता, हेतू मेहता व स्वतः ज्येष्ठ नृत्यांगना नमिता गोदाजी या विविध शास्त्रीय नृत्यप्रकार सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी गायन साथ नमिता गोदाजी स्वतः असणार असून सुप्रसिद्ध गायक शिवप्रसाद हे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सहगायन साथ करणार आहेत .मृदुंगावर पंचम उपाध्याय यांची साथ असून या कार्यक्रमासाठी सातारा येथील नृत्य प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिराचे वतीने करण्यात आले आहे.