फलटण प्रतिनिधी – साखरवाडी मध्ये दोन राजकीय ग्रुप आहेत,आम्ही विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. गेल्या पंचवीस ते तीस वर्षे आम्ही जि कामे केली ती सर्वसामान्य लोकांना माहीत आहेत. त्या मुळे त्याच कामाच्या जीवावर आम्ही पक्षाने आदेश दिल्यास कोणत्याही निवडणुकीत उभा राहायला असे पंचायत समितीचे माजी सभापती यांनी शंकरराव माडकर यांनी सांगितले.
साखरवाडी राष्ट्रवादी काँग्रेस ‘राजे गट’यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते,यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन नितीन भोसले,जेष्ठ नेते के. के. भोसले,सुनील माने,अरुण गायकवाड,शरद जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शंकरराव माडकर या म्हणाले की, साखरवाडी कारखाना सुरू होण्यासाठी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खूप कष्ट घेतले आहे, तसेच शेतकऱ्यांना मिळालेले उसाचे पैसे एन सी एल टी चे नियमानुसार मिळालेत,व राहिलेले सर्व पैसे सुद्धा मिळणार आहेत. त्याची तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ज्या राजे गटाच्या माध्यमातून राजकारणात आला,त्यांना बाजूला काढून तुम्ही विरोधकांना बरोबर घेत तुमचे राजकारण सुरू ठेवले आहे,
सण १९८४ व १९८९ साली आम्ही चुका केल्या व झाल्या, मात्र त्यानंतर समाजकारण राजकारणात आम्ही भान ठेवून काम करतो,तेव्हा तत्कालीन नेतेमंडळी आमच्या विरोधात गेली,त्या मुळे डिके ना सरपंच होता आले नाही,असे माडकर यांनी सांगितले, मात्र १९९५ ला गटबाजी संपली,आणि ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कामाची संधी मिळाली,त्यामुळे सर्व गट तट बाजूला सारून आम्ही राजे कुटुंबाच्या मागे उभे राहून सर्व साखरवाडी जनतेने राजे गटाला मतदान केले, विक्रमसिंह भोसले यांना आम्ही राजकारणात आणले,पण ते उपकार विसरले मागील पंचवार्षिक मध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासमोर ठरले होते की विक्रमसिंह भोसले व समीर भोसले यांनी अडीच अडीच वर्षे सरपंच पद ठरले होते, पण विक्रमसिंह भोसले यांनी शब्द पाळला नाही,म्हणून आमच्यात फूट पडली त्यास विक्रमसिंह भोसले जबाबदार आहेत असे माडकर यांनी सांगितले.
कोणतीही निवडणुकीचे मतदान संपते तेव्हा संध्याकाळी आम्ही सर्व नेतेमंडळी एकत्र चहा प्यायला बसतो, ही साखरवाडी तील राजकीय परंपरा आहे पण आता तुम्हीच राजकारणात वेगळ्या पद्धतीने वागत आहात असे माडकर म्हणाले, राजकारणात जय-पराजय येत असतो आम्ही पराभवने खचत ही नाही, व विजयाचा उन्माद ही करीत नाही, मी तुम्हाला राजे गटात आणले हे मात्र विसरू नका,आम्ही सरपंच केले,अडीच अडीच वर्षे ठरले होते, शब्द पाळला नाही,पाच वर्षात तुम्ही राजे गटाच्या एकाही नेत्यांच्या एकही उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला नाही,व त्यांना बोलवले ही नाही,पाणी पुरवठा योजनेचा अडीच कोटी रुपयांचा साधा नारळ फोडला नाही,श्रीमंत संजीवराजे यांनी साखरवाडी गटात १०/१२कोटी रुपयांची कामे केली,दरम्यान आमच्या गटामुळे तुमची ओळख, आमदार मंत्री पदरावरील वक्तव्य डि.के पवार बोलण्याच्या ओघात बोलून गेले त्यांच्या बोलण्याचा विपर्यास झाला त्यांच्या बोलण्याचा हेतू वेगळा असल्याचे माडकर यांनी सांगितले.
आत्तापर्यंत श्रीदत्त कारखान्याने २५ कोटी रुपये दिलेत, ४८ कोटी पैकी देणे बाकी होती,मात्र उरलेली देणी सुद्धा लवकरच दिली जाणार आहेत. कारखान्यात आज ६००/७०० कामगार आहेत,त्यांचे जीवन त्यावर अवलंबून आहे व अजून इतर १०० कामगारांना काम मिळाले आहे,त्यांचा व ऊस उत्पादक शेतकरी यांचा विचार करून हा कारखाना सुरू करण्यासाठी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले,व या साखरवाडी मध्ये पुन्हा वैभव अवतरले आहे.
कारखाना बंद असताना अनेकांनी साखरवाडी सोडली, बारामतीत गेले,म्हणून मी व माझ्या सहकाऱ्यांनी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना ही परिस्थिती सांगितली,मग कोणत्याही परिस्थितीत हा कारखाना सुरू करू असे ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाचन दिले होते, त्या मुळे तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही, शेतकऱ्यांना नक्कीच राहिलेले पैसे मिळतील,यावेळी बोलताना माडकर यांनी सांगितले की माझं श्रेय व काम काय आहे ते लोकांना माहिती,ते तुम्हाला दिसणार नाही, असे माडकर यांनी विक्रमसिंह भोसले यांना सांगितले
“आमदार मंत्री पदावरील वक्तव्य मी बोलण्याच्या ओघात बोलुन गेलो, महानंदा डेअरी मुंबई उपाध्यक्षपदी काम करत असताना महाराष्ट्र शासनाने मला गाडी बंगला दिलाय,मी राज्यावर काम करतो, लोकांची कामे केली आहेत.माझा १९८९ ला ऐतिहासिक विजय झाला होता, कल्पना होती की नक्कीच सरपंच होईल,मात्र तत्कालीन नेत्यांनी मला बाजूला केले,या मुळे जीवनात अनेक संधी हुकल्या,पण आता महानंदा डेअरीचा माध्यमातून चांगले काम करीत आहे. त्या मुळे मी खाली येऊन निवडणूक लढवणार नाही –
डि.के. पवार -उपाध्यक्ष महानंद डेअरी मुंबई.