सातारा सायबर पोलीसांची हरियाणा राज्यात जाऊन कारवाई
सातारा : फेसबुक अकौंट हॅक करुन पैशाची मागणी करणाऱ्या वाहिद हुसेन नुर महंमद (वय २३ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. पिरथी बास, गांव शिक्रवा, तालुका पुन्हाना , जिल्हा नुह, राज्य हरियाणा) याला हरियाणा येथे जावून अटक करण्यात सातारा सायबर पोलीसांना यश आले आहे.
याबाब पोलिसांनी दिलेली माहीती अशी, दि.२७ ऑगस्ट २०२१ रोजी फेसबुक अर्कोट हॅक करुन पैशाची मागणी केलेबाबत गुन्हा वडुज पोलीस ठाणेवरुन सातारा सायबर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला होता. गुन्हयाचा तपास करुन आरोपी अटक करण्या कामी पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बंन्सल व पोलीस उप अधीक्षक सातरा अजित बोन्हऱ्हाडे यांचे आदेश देण्यात आले होते. त्याप्रमाणे सायबर पोलीस ठाणे, सातारा यांनी सदर गुन्ह्याचा तांत्रिक पध्दतीने तपास करुन राजस्थान व हरियाणा राज्यातील आरोपी निष्पन्न केले होते. त्याप्रमाणे मा.पोलीस अधीक्षक सो. सातारा अजयकुमार बन्सल यांचे आदेशान्वये पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोऊनि विशाल भंडारे, पोना अमित झेंडे, पोना अजय जाधव , पोकों गणेश पवार या टिमने हरियाणा राज्यात जावून तेथे सापळा लावुन स्थानिक पोलीसांचे मदतीने आरोपीस अटक केली आहे. आरोपीला न्यायालयाने दिनांक ०२ ऑक्टोबर २०२१ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेली आहे.
मा.पोलीस अधीक्षक अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोऱ्हाडे यांचे सुचनांप्रमाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि विशाल भंडारे, पोना अमित झेंडे, अजय जाधव, गणेश पवार, सचिन पवार, संदिप पाटील, अनिकेत जाधव, महेश शेटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.