महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
कराड, दि. 25 , एप्रिल : महाराष्ट्र शासन गृहविभाग मंत्रालय यांचा आदेशानूसार राज्यात जातीय तणावाच्या परिस्थिचितीत क़ायदा व सुव्यवस्था , जातीय सलोखा व शांतता राखण्याचा दृष्टिने जिल्हास्तरीय शांतता समीती गठीत केली आहे. या समितीवर राष्ट्रवादीचे अॅड. वैभव मोरे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. त्यांचा अनेक क्षेत्रातील सामाजिक कार्याची दख़ल घेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निवड केली आहे.
या समितीवर समाजातील मान्यवर व्यक्ति वकील निवृत्त पोलीस अधिकारी ,डॉक्टर यांचा पैकी 1 सदस्य असतो. अॅड. वैभव मोरे हे कोरेगाव तालुक्यातील रेवड़ी गावचे असुन ते आमदार शशिकांत शिंदे यांचे विश्वासु सहकारी आहेत. तसेच राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. क़ायदेविषयक माहिती तसेच मोफत क़ायदेविषयक सल्ले या विविध सामाजिक कार्यामधे तसेच युवकांचे प्रश्न ते सोडवत असतात. या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड केली आहे.
अॅड. वैभव मोरे यांचा या निवडीबद्दल पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील , आमदार शशिकांत शिंदे, युवकचे जिल्हाअध्यक्ष तेजस शिंदे, राजकुमार पाटील, गोरखनाथ नलावडे ,अतुल शिंदे , ज़िल्हयातील विविध मान्यवरानी त्यांचे अभिनंदन केले.