बारामती प्रतिनिधी
काल नव्याने ९६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ८३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त झालेल्या अहवालात पैकी शहरातील ९ व ग्रामीण भागातील ४ असे १३ रुग्ण आज पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खाटीक गल्ली येथील ४७ वर्षे पुरुष व शहरातील १७ वर्षीय युवक व रुई येथील २७ वर्षीय युवक यांचा समावेश आहे.तर प्रगती नगर येथील ५२ वर्षीय वडिलांसह २४ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. तांदूळवाडी येथील ७० वर्षीय महिला येथीलच ४५ वर्षीय महिला व कृषी देवनागरीतील ३६ वर्षे पुरुष यांना कोरोना ची लागण झाली आहे. समर्थनगर येथील ६५ वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागातील गुणवडी येथील ३७ वर्षीय पुरुष माळेगाव बुद्रुक येथील २९ वर्षीय पुरुष बहाणपूर येथील ५७ वर्षे पुरुष व निंबोडी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील त्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झालेली आहे.






















