महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. २५ एप्रिल : राज्यातील सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, मुंबई, ठाणे, नागपूर इत्यादी ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व जिल्हा आरएसपी संघटनांनी एकत्र येऊन काम केल्यास संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेले सकारात्मक कार्य हे संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरेल आणि राज्यातील आरएसपी संघटनांनी एकत्र काम करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर यांनी केले.
हडपसर (पुणे) येथील साधना विद्यालयामध्ये आयोजीत केलेल्या महाराष्ट्र वाहतूक सुरक्षा दलाच्या नागपूर संघटनेच्या वार्षिक सभेच्यावेळी
आरएसपी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य वाळवेकर बोलत होते.
अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शेंडे होते. यावेळी आरएसपी संघटनेचे
महासमादेशक तिडके, उमेश देशमुख, सी. बी. साळुंखे, महेश जाधव, अनिल कुंभार, साळवी, मोरे, राठोड, बोंतले यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अनिल कुंभार, उमेश देशमुख यांनी संघटनावाढीच्या निमित्ताने उद्बोधक मार्गदर्शन केले.
सदरची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.