महाराष्ट्र न्यूज फलटण प्रतिनिधी गणेश पवार
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, स्कूल गेम फेडरेशनमान्यताप्राप्त भारतीय कुराश महासंघ द्वारा आयोजित महाराष्ट्र राज्य कुराश चॅम्पियनशिप २००२०/२१ नुकतीच तालुका क्रीडा संकुल इंदापूर जिल्हा पुणे येथे कोरोनाजन्य परिस्थितीत सर्व नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात पार पडल्या. पुणे जिल्हा कुराश असोसिएशनने उत्तम रित्या सर्व स्पर्धाचें आयोजन व नियोजन पार पडले. ही स्पर्धा सब जूनियर, कॅडेट, जूनियर व सिनियर गटात पार पडली या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या गटात बहुसंख्य खेळाडू सहभागी झाले. या स्पर्धेचे उद्घाटन महेश चावले तालुका क्रीडा अधिकारी,शिवाजी साळुंके. सचिव महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशन, योगेश उंटवाल तांत्रिक सचिव महाराष्ट्र राज्य कुरश असोसिएशन ,संतोष पवार- ब्लॅक बेल्ट ४ था द्यान कराटे, कुराश प्रशिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.
वरील स्पर्धेत फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लभाई हायस्कूल व ज्युनियर कॉलेज साखरवाडी यांच्या वतीने खालील खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले व प्रथम क्रमांकाच्या ८ खेळाडूंची निवड दि.२२ते २५ मार्च २०२१ रोजी पंचमढी मध्यप्रदेश येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झालेले आहे.यामध्ये चमकदार कामगिरी केलेले खेळाडू पुढील प्रमाणे-सब – जूनियर- प्रगती संतोष काटे ५२ कि द्वितीय , कॅडेट पूजा रमेश मोहिते ४० कि. प्रथम वैष्णवी तुषार मोहिते ४८ कि.प्रथम, ज्ञानदा मोहन शिंदे५७ कि प्रथम
जूनियर गट- किरण सिताराम गायकवाड ४० कि. प्रथम ,करूणा विजय काटे ४४ कि. प्रथम ,अंजली चंद्रकांत शिंदे ४८ कि द्वितीय,अनुष्का जयपाल शिंदे ७० प्रथम
सीनियर गट- काजल सिताराम गायकवाड ४४ कि प्रथम ,हर्षदा शंकर दोरके ८७ कि प्रथम यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक तुषार मोहिते सर यांचा सन्मान रामराजे नाईक निंबाळकर- सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य ,रघुनाथराजे नाईक निंबाळकर- अध्यक्ष कृषी उत्पादन बाजार समिती फलटण , संजीवराजे नाईकनिंबाळकर -अध्यक्ष महाराष्ट्र खो-खो असोसिएशन,अरविंद निकम प्रशासन अधिकारी फ. ए. सो.,श्रीकांत फरतडे अधीक्षक फ. ए. सो.,भोजराज नाईक निंबाळकर. चेरमन स्कूल कमिटी,बापुसो नाईक निंबाळकर व्हाइस चेअरमन स्कूल कमिटी व सर्व पदाधिकारी तसेच बी.एम. गंगवणे प्राचार्य, सर्व शिक्षक स्टाफ, विद्यार्थीआणि पालक, यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.






















