कराड पारंपरिक शिवजयंतीच्या मिरवणुकीने फेडले डोळ्यांचे पारणे उसळला जनसागर
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड शहर आज दणाणुन गेले. निमीत्त होते पारंपारीक शिवजयंतीनिमीत्त शहरातुन घोडे, चित्ररथ, वाद्ये, तुताऱ्यांच्या ललकारीत महिला, नागरीक, युवक, युवतींच्या उपस्थितीत दिमाखात काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे.
शहरात दरवर्षी पारंपारीक शिवजयंती दिमाखात साजही केली जाते. कोरोना नंतर दोन वर्षांनी होत असलेल्या यंदाच्या मिरवणुकीत तरुणांचा मोठा जोश दिसुन आला. येथील पांढरीच्या मारुती मंदिरापासुन सायंकाळी सातनंतर मिरवणुकीस पालखी पुजनाने हिंदु एकता आंदोलनाचे विनायक पावसकर, विक्रम पावसकर, अतुल भोसले, सौरभ पाटील, जयवंत पाटील, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, मुकुंद चरेगावकर, फारुख पटवेकर, मजहर कागदी यांच्यासह माजी नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
पारंपरिक वेशभूशेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्यासह स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या,अश्वांचा गोल रिंगण सोहळासंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या,अश्वांचा गोल रिंगण सोहळाडोळ्याचे पारणे फेडणा-या रिंगण सोहळ्याचे पांडुरंग भजनी मंडळातर्फे आयोजन केले होते .
बेळगावात उद्या शिवजयंती चित्ररथ मिरवणूक, मराठमोळ्या संस्कृतीचे घडणार दर्शनबेळगावात उद्या शिवजयंती चित्ररथ मिरवणूक, मराठमोळ्या संस्कृतीचे घडणार दर्शनदोन वर्षानंतर बुधवारी बेळगाव शहरात पुन्हा एकदा शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीचा जल्लोष
मिरवणुकीत पारंपारीक वेशभुषा परिधान करुन घोड्यावर स्वार झालेले युवक, युवती, महिला, वाद्ये, घोडी, नागरीक, महिला, तरुण- तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत हणुमानाची वेशभुषा केलेला कलाकार सहभागी झाले होते. धिप्पाड शरीयष्टीच्या हणुमानाने सर्व मिरवणुकीचे लक्ष वेधले. युवक, युवतींसह बालगोपाळांचे मिरवणुकीतील ते आकर्षण ठरले. मिरवणुक पांढरीच्या मारुती मंदिरापासुन कन्याशाळेसमोरुन, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकात नेण्यात आली. तेथे मिरवणुकीचा समारोप झाला.शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील एका उंच वाहनात भाजपचे विक्रम पावसकर यांच्या समवेत भाजपचे खासदार रणजितसींह नाईक-निंबाळकर, भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी आमदार शेलार यांनी जोरदार घोषणाही दिल्या. त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.