महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नंदिकेश्वर विद्यालयातील चौदा विद्यार्थी पात्र ठरले असून सृष्टी व वैष्णवी या दोघी मुळीक बहिनींनी देखील शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरत बाजी मारली आहे .
जंक्शन (ता.इंदापूर) येथील नंदिकेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज मधील इयत्ता-५ वीचे १३ विद्यार्थी व इयत्ता-८ वीचा १ विद्यार्थी पात्र झालेले आहेत . यामध्ये या विद्यालयात एकाच वर्गात शिकत असलेल्या सृष्टी व वैष्णवी मुळीक या दोघी बहिनींनी पात्र ठरत बाजी मारली आहे .
यामध्ये इयत्ता-५ वीचे पात्र ठरलेले विद्यार्थी अनुष्का गवळी , गायत्री जामदार , मानसी गायकवाड , प्रतीक्षा घाडगे , सानिका गावडे ,संस्कृती शेलार , शिवम होले , शुभम गोरे , सृष्टी मुळीक , तुषार काटे,वैष्णवी घुले , वैष्णवी मुळीक , यश धापटे तर इयत्ता आठवीसाठी विद्यार्थी साबिर शहरवाले पात्र ठरला आहे .
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत मोहोळकर , सचिव रोहित मोहोळकर व विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत सोळसे यांनी अभिनंदन केले .






















