नवारस्ता प्रतिनिधी : नुकत्याच झालेल्या रमजान ईद साठी शिव – शंभू दुध उत्पादक संघ लि. दौलतनगर यांचेमार्फत मुस्लिम समाजास टैंकरने दुध पुरवठा करणेत आला. यावेळी दुध संघाचे चेअरमन, व्हा. चेअरमन, व सर्व संचालक, व्यवस्थापक सुरज आगाणे, पाटण नगरपंचायतचे नगरसेविका सौ. आस्मॉ सादिक इनामदार, शैलजा मिलींद पाटील, माजी नगरसेवक गणीभाई चाफेरकर, सौ. मनीषा जंगम, शिव अल्पसंख्याक सेना पाटण तालुका अध्यक्ष इरफान सातारकर, सलीमभाई इनामदार, मनोज पाटील, कारखाना संचालक बाळासाहेब शेजवळ, शफीभाई सातारकर, इकबाल सैय्यद, आदी उपस्थित होते. पाटण रामापूर मधील मुस्लिम समाज हा सदैव लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांचेपासूनच एकनिष्ठ आहे. रामापूर मधील एक तेजस्वी तारा कै. जैनुद्दीन शेख (जे. शाहीर) हे लोकनेत्यांचे खास मित्र होते. याचा प्रत्यय वेळोवेळी आला असे जानकारांचे मत आहे. लोकनेत्यांचे नंतर त्यांचे नातू शंभूराज देसाई यांनी ही धूरा संभाळली. नगरपंचायत निवडणूकी वेळी सलग दोन टर्म शंभूराज देसाई यांच्या विचाराचे रामापूर मधील नगरसेवक निवडून येत आहेत. रामापूर वासियांची देसाई घराण्यावर अपार निष्ठा असलेने ना. शंभूराज देसाई यांनी यावर्षी मुस्लिम समाजासाठी सवलतीच्या दरात आपल्या शिव – शंभु दुध संघाकडून दुध विक्री करण्याचे ठरविले, आणि देसाई उद्योग समुहाचे प्रमुख श्री.यशराज देसाई यांचेबरोबर बोलणी केली. श्री. यशराज देसाई यांनी शिव – शंभु दुध संघाचे व्यवस्थापक श्री. सुरज आगाणे यांना तशी सुचना केली.
श्री. सुरज आगाणे यांनी तसे पद्धतशीर नियोजन करून पाटण, रामापूर, व आसपास च्या खेडोपाड्यातील नागरीकांना अल्प दरात तब्बल 2185 लीटर दुधाचे वाटप केले. गेली कित्येक वर्षे मुस्लिम समाजातील लोकांना वेगवेगळ्या डेअरी मधून प्रत्येक वर्षी दूध आणताना फरकट होत असे, कोणी अव्वाच्या सव्वा दर सांगत तर कोणी व्यवसायावर गदा आणत. परंतु या वर्षी नागरिकांना रू. ५० ली. मध्ये घरपोच, एकदम निर्भेळ, चोख व उच्च प्रतीचे दुध मिळालेने सर्व मुस्लिम समाज ना. शंभूराज देसाई साहेब, यशराज देसाई, शिव – शंभु दुध संघाचे व्यवस्थापक सुरज आगाणे व शिव अल्पसंख्याक सेना पाटण तालुका अध्यक्ष इरफान सातारकर यांचे आभार मानले. आणि दरवर्षी असेच सहकार्य करावे अशी विनंती केली.