
नोंदनिकरिता कार्यालयात च सुविधा उपलब्ध करून दिली गेली असून याचा लाभ शहरातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख निलेश मोरे यांनी केले आहे .
निलेश मोरे यांनी ई श्रम कार्ड नोंदणी अभियानबाबत माहिती देताना म्हणाले ई श्रम कार्ड काढणाऱ्यास २ लाख रुपयांचा मोफत विमा आहे,हे कार्ड घरकाम करणाऱ्या,दुकानात काम करणारे,रिक्षा चालक,मॅकेनिक,बांधकाम कामगार,प्लांबर आणि इतर कामगार यांचा समावेश आहे
त्याकरिता ज्यांचे वय १६ ते ५९ वर्षे दरम्यान आहे असे पात्र असणार आहेत जे आयकर गोळा करतात ते पात्र नसणार आहेत
ही नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड,मोबाईल क्रमांक,बँके खाते पुस्तक आवश्यक आहे
सातारा शहर शिवसेनेच्या व सातारा पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विध्यमानाने वतीने ही नोंदणी सुरू असून नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे
नोंदणी मोफत असून त्याचा लाभ सातरकराणी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे…





















