– सातारा जिल्हा हा मुख्यमंत्री मा.ना .एकनाथजी शिंदे यांचा जिल्हा पण त्यांच्या जिल्ह्यामध्ये पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी मिळेना ही वस्तुस्थिती आहे . या पूर्वी पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणुन डॉ . राधाकृष्ण पवार कार्यरत होते पण त्याची ४ महिन्यापूर्वी उपसंचालक पुणे या ठिकाणी पदोन्नती झाली त्यानंतर डॉ. वैशाली बडदे यांचेकडे अतिरिक्त पदभार दिला गेला , त्यांचा कार्यकाल फार वादग्रस्त झाला त्यांचेवर पक्षपाती पणा व औषध खरेदी भ्रष्टाचार झाले कालांतराने त्यांचीही बदली पुणे येथे झाली सध्या सातारा जि.प आरोग्य विभागाची मदार तात्पुरती का होईना डॉ.गायकवाड यांचेकडे आहे. त्याकडे कुष्ठरोग विभागाचा अतिं सहा .संचालक पदाचा कार्यभार असुन ज्यादाचा पदभार जिल्हा आरोग्य अधिकारी याही पदाचा आहे. जिल्ह्यामध्ये आरोग्य विभागाचे बरेच प्रश्न आ वासून उभे आहेत . त्यामध्ये कर्मच्यारी पदोन्नती’ ‘ रिक्त पद भरणे , कंत्राटी पदभरती करताना जिल्हा वासीय तरुणांचा विचार करणे , जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी कर्मचारी ठाण मांडून बसलेले आहेत त्यांची प्राधान्याने बदली करणे , कर्मचारी यांच्या कार्यसुची प्रमाणे कामकाज न देता दुसरे कामकाज सोपवणे , प्रा आ केंद्र व उपकेंद्राच्या बांधकामाची प्रतवारी सुधारणे . ग्रामीण भागात तळागाळातील गरजु लोकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे कर्मचारी/ अधिकारी यांचे मानसिक आरोग्य सुधारण्याकरीता प्रयत्न करणे.इ . सातारा जिल्हयाला आतापर्यंत डँशिंग जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणुन डॉ दिलीप पाटील लाभले होते ते कर्मचारी व अधिकारी यांचे हिताचे निर्णय सर्वांना सोबत घेऊन व कोणताही पक्षपाती न घेता करणारे होते म्हणुन त्याच्या बद्दल कर्मचारी /अधिकारी यांच्या मध्ये आदरयुक्त भिती होती .डॉ राजेश गायकवाड यांचेकडे तात्पुरता चार्ज असला तरी भविष्यात पुर्ण वेळ चार्ज त्यांचे कडेच येण्याची शक्यता नाकारता येत नाही , कारण ते मॅग्मो संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत तसेच पालकमंत्र्यांच्या विश्वासु कार्यकर्त्याचे नातेवाईकही आहेत. राजकीय वरदहस्त असला तरी सर्व कर्मच्यारी घटना समान वागणुक देवून व सर्वांना सोबत घेवून तसेच कोणताही पक्षपाती न करता हा जिल्ह्याचा कारभार चालवला तर सातारा जिल्हा सर्व आरोग्य विषयक कामकाजा मध्ये अग्रगण्य राहील या दृष्टीने नवीन पदभार घेणाऱ्या डॉ राजेश गायकवाड मार्गक्रमण करावे अशी अपेक्षा . पण मा .मुख्यमंत्री महोदयानी स्वतःच्या जिल्ह्यावर लक्ष घालुन पूर्ण वेळ जिल्हा आरोग्य अधिकारी द्यावा अशी मागणी जोर धरु लागली आहे .




















