अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सुशांत सिंह प्रकरणाचा तापास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.
सुशांत सिंह प्रकरणात मुंबई व बिहार या दोन्ही राज्यातील पोलीसांमध्ये तपासावरून वाद सुरु होता. त्यातच रोज नवनवीन खुलासे होत होते त्यामुळे या घटनेचे महत्त्व वाढलं होतं.त्यामुळे या घटनेचा तपास सीबीआय कडे द्यावा अशी ही मागणी जोर धरत होती. अखेर ती मागणी पूर्ण झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झालेल्या सुनावणीत मुंबई पोलिसांना मोठा झटका दिला. सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरणाचा तापास सीबीआयकडे सुपूर्द केला. तसेचं मुंबई पोलिसांनी सर्व पुरावे सीबीआयला द्यावे. तपासात सीबीआयला सहकार्य करावे असे आदेश दिले आहेत