महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कालगांव ता.कराड येथे नव्याने अतिरीक्त 33 केव्ही विद्युत लाईन जोडणी काम पुर्ण झाल्यानंतर परिसरातील कृषीपंप धारक शेतकर्यांना महावितरण देत असलेल्या वेळेमध्ये अखंडीत विज पुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, शेती सह जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आदरणीय पी डी पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक युवा नेते मा.सागर पाटील (दादा) व्यक्त केला.
ते राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून महावितरणचे कृषी धोरण 2020 अंतर्गत पेरले ता.कराड येथील सब स्टेशन करिता कालगांव येथे आठ किलो मीटर अंतरात 33 केव्ही विद्युत लाईन जोडणी कामाचे भूमिपूजन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
सागर पाटील (दादा) पुढे म्हणाले की, परिसरातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांनी महावितरण पुरवत असलेल्या वेळेमध्ये अखंडित वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, तसेच शेती आणि पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी यासाठी नामदार बाळासाहेब पाटील यांचेकडे मागणी केली होती, त्यास अनुसरून नामदार बाळासाहेब पाटील यांनी महावितरणमार्फत ३३ केव्हीच्या सबस्टेशनकरीता आठ किलोमीटर अंतरात स्वतंत्र विद्युत जोडणी करावी यासाठी विशेष प्रयत्न केले असून, नव्याने आठ किलोमीटर अंतरात स्वतंत्र विद्युत लाईन जोडणीच्या कामाचा आज शुभारंभ होत असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर पेरले, कालगांव व परिसरातील कृषीपंप धारक शेतकऱ्यांना महावितरणकडून पुरवण्यात येणाऱ्या वेळेमध्ये अखंडित वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर होणार आहे. नामदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून परिसरातील सर्व विकासकामे प्रगतीत असून यापुढील काळातही लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याची खात्री सागर पाटील (दादा) यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.सुरेखा जाधव, पंचायत समितीचे सदस्य रमेश चव्हाण, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक पै.संजय थोरात, लालासाहेब पाटील, शहाजीराव चव्हाण, आदरणीय पी.डी. पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक उमेश कदम, प्रतापराव चव्हाण, सयाजीराव चव्हाण, मिलिंद चव्हाण, कालगावच्या सरपंच सौ.संगीता चव्हाण, योगेश चव्हाण, दिलीपराव चव्हाण, जयवंतराव चव्हाण, अभिजीत पाटील, विलास खांबे, भरत माने, आण्णा पाटील, पोपट मोरे, मंगेश भोसले, तानाजी फडतरे, महेश निकम, सुजित चव्हाण, सह्याद्रि कारखान्याचे संपर्क प्रमुख आर.जी.तांबे, महावितरणचे अधिकारी श्री कुंभार, श्री माळवदे व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.