पारंपारिक होणाऱ्या शिवजयंतीला हिंदू एकता आंदोलना कडून राजकीय वळण देण्याचा प्रयत्न : शशिकांत करपे शिवसेना कराड शहराध्यक्ष
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : कराड येथील पारंपारीक शिवजयंती नुकतीच साजरी झाली पुण दरबार मिरवणूक पाहिल्यानंतर ही शिवजयंती हिंदू एकता आंदोलनने घेतली होती की भाजपने असा प्रश्न तमाम कराड करांना पडलाय… या शिवजयंतीवरुन काही मुद्दे समोर आले आहे जे लोकांच्या मनात आहे ते शिवसेनेच्या वतीने आम्ही मांडत आहोत.
वास्तविक दरबार मिरवणुकीत सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे लोक सहभागी झाले होते. हे कराडकरांनी पाहिले आहे. अशावेळी विक्रम पावस्कर यानी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना बोलावून त्यांना जनसमुदयासमोर बोलायला लावून ही शिवजयंती जनु भाजपची आहे असा आभास तयार करण्याच्या केविलवाणा प्रयत्न कराडकरांच्या जिवारी लागला आहे. त्यामुळे संयोजकांनी काही तरी बोध घ्यावा नाहीतर कराडकरांना वेगळा विचार करावा लागेल.खरतर जेष्ठ नगरसेवक आण्णा पावस्कर यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. यापूर्वी आम्ही शिवजयंती मध्ये सामील होत होतो. त्यावेळी आम्ही लावलेला डॉल्बी आण्णांना खटकला होता तो आम्हाला अनेकदा काढायला भाग ही पाडला..”हे आपल्याला शोभते का? असे त्यांनी आम्हाला हक्काने सुनावले व ते आम्ही सुध्दा हक्काने स्विकारले.. पण त्यांचे वारसदार विक्रम पावसकर डिजे लावून हजारो तरुणांना त्यावर थिरकवतात..इथ स्वतःहा थिरकतात हे आण्णांनी कसे स्विकारले!याचे उत्तर आण्णांनी देणे अपेक्षित आहे.
कराड शहराने आजपर्यंत सामाजिक सलोखा राखला आहे. शिवजयंतीमध्ये सर्व जाती धर्माचे बांधव आपआपल्या परिने योगदान देतात .अशा वेळी कराडच्या शिवजयंतीमध्ये “छ.शिवाजी महाराज की जय”हया घोषणा ठिक आहेत परंतु इतरांच्या भावना दुखण्यासारख्या घोषणा दिल्या जातात..याचे उत्तर विक्रम पावसकर यांनी देणे अपेक्षित आहे.याशिवाय बरेच प्रश्न कराडरांच्या मनात आहे. परंतु सध्या तने संयोजकांनी एवढ्या प्रश्नावर उत्तर दयावे एवढी अपेक्षा आहे.शिवसेना तालुका प्रमुख नितीन काशिद, शशिकांत हापसे, महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई जाधव, शहर प्रमुख शशिराज करपे, उपशहर प्रमुख अक्षय गवळी, शेखर बर्गे, साजीद मुजावर, मयुर देशपांडे, अक्षय मोहिते, शंभूराज रैनाक, जोतीराम साळी सर तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.