महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :अमोल राजपूत (वालचंदनगर)
कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर सुरक्षित अंतर ठेवून बोला मित्र असो इतर कोणत्याही व्यक्ति त्याच्या शरीराला ,कपड्याला स्पर्श करू नये. सतत सेनिटायजर चा वापर करा,हात पाय साबणाने अथवा लिक्वीड साबणाने दर दोन तासांनी धुवायचा आणि नंतर जेवण वगैरे गोष्टी करायच्या आहेत बाहेर जाताना तोंडावर रुमाल अथवा मास्क बांधण्यात आला पाहिजे गर्दीच्या ठिकाणी जाणे अथवा गर्दी करणे टाळावे वयस्क व्यक्ती,लहान मुलांना बाहेर घेऊन जाऊच नये अत्यावशक गरजे नुसार बाहेर जावे दररोज ताजे अन्न गरम जेवण करावे फ्रिज मधील थंडगार पाणी अथवा पदार्थ खाऊ नये बाहेरगावच्या नवीन आलेल्या व्यक्ती च्या जवळ जाऊ नये त्याची आरोग्य केंद्रात तपासणी करण्याची त्यास विनंती करण्यात यावी जर आपणास आजार पणाचे लक्षण दिसले तर लगेच आपल्या डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून औषध सुरू पाहिजे बाहेर गावी जाणे टाळावे या गोष्टी आपण सर्वांनी मिळून पाळल्या तर लवकरच आपण आपले शहर,राज्य,देश कोरोना मुक्त करू शकतो