केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २ अभियानामध्ये वाढीव पाणी पुरवठा योजनेस मंजुरी, ६६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर : आ. महेश शिंदे
पुसेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहराचा विकासात्मक कायापालट करत असताना आमदार महेश शिंदे यांनी आगामी पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न निकाली काढला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २ अभियानामध्ये वाढीव पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी देण्यात आली असून, ६६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृष्णा नदीमध्ये गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या बंधार्याजवळ नवीन योजना कार्यान्वित केली जाणार आहे. ७० हजार लोकसंख्येसाठी प्रतिदिन साडेतीन लाख लीटर क्षमता असलेली ही पाणी योजना असून, एकूणच शहरवासियांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, कोरेगावला सर्वाधिक मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली.
२०१९ मध्ये कोरेगावकर नागरिकांनी विक्रमी मताधिक्य देत विधानसभेत जाण्याची मोठी संधी उपलब्ध करुन दिली. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविला असून, कोरोना कालखंडानंतर वायुवेगाने कोरेगाव शहराचा विकास केला आहे. गेली अनेक वर्षे विकासकामांपासून कोसो हात दूर असलेल्या या शहराचा कायापालट केला आहे. जुने खडीकरण, डांबरीकरणाचे रस्ते इतिहास जमा करत नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे पुणे-मुंबई या महानगरांच्या धर्तीवर ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरणाचे रस्ते, बंदिस्त गटारांची कामे एका झटक्यात मार्गी लावली. शहरवासियांना सतावत असलेले मूलभूत सोईसुविधांचे प्रश्न देखील एका झटक्यात मार्गी लावले आहेत. रस्ते, गटर्स, स्मशानभूमी, उद्यान-बागबगीचे, प्रशासकीय इमारती आदी कामे मार्गी लावल्यानंतर पाणी पुरवठा योजना अधिक सक्षम करण्याकडे विशेष भर दिला होता. त्यास केंद्र सरकारने अमृत दोन अभियानामध्ये मंजुरी दिली असून, प्रत्यक्षात ६६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता आर. एस. राहाणे यांनी तांत्रिक मान्यता दिली असून, निधी देखील वर्ग केला असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
कोरेगाव शहराला पूर्वीच्या वसना-वांगणा नदीवरुन पाणी पुरवठा केला जात होता, शहराची वाढ जशी-जशी होत होती, तशी पाण्याची मागणी वाढत गेल्याने १९९५ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून कृष्णा कठापूर योजना राबविण्यात आली. अपेक्षित असे या योजनेचे काम झाले नाही, त्यानंतर आलेल्या जलस्वराज्य योजनेद्वारे पाणी पुरवठा योजना मजबुतीकरण केले गेले, मात्र ती योजना देखील पूर्ण क्षमतेने चालली नाही, कालांतराने पाणी टंचाईचे भूत कोरेगावकरांच्या डोक्यावर बसले. ग्रामपंचायतीच्या काळात छोट्या-छोट्या योजना राबविण्यात आल्या, काही प्रभागात स्थानिक विहिरी व आड अधिग्रहण करुन पाणी पुरवठा केला जात होता, त्याद्वारे वार्षिक कोट्यवधी रुपयांचे वीज बील भरावे लागत होते, विकासकामांचा पैसा केवळ पाणी पुरवठ्यावर खर्च होत होता, त्यामुळे शहराला नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा निर्णय घेतला होता, त्यादृष्टीने या क्षेत्रातील तज्ञांना पाचारण करुन संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करण्यात आले, शहराचा परिसर हा समतल नाही, काही भागात उंच टेकड्या व चढाचा परिसर असल्याने सर्वच विभागात पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा व्हावा, यासाठी वस्तुस्थिती दर्शक अंदाजपत्रक तयार केले होते, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे पदसिध्द सभापती सुनीलदादा बर्गे यांनी मुख्याधिकारी विजया घाडगे व सहयोगी नगरसेवक, नगरसेविकांशी संवाद साधून प्रत्येक प्रभागातील पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन योजनेची डिझाईन तयार करुन घेतली होती. कठापूर येथे असलेली सध्याची पाणी पुरवठा योजना ही जुनी झाली असून, खार्चिक असल्याने कृष्णा नदीवरच कठापूर गावच्या हद्दीत गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या बंधार्याजवळ नवीन योजना कार्यान्वित केली जाणार आहे. तेथे जॅकवेल, पंपहाऊस उभारण्यात येणार असून, त्यासाठी अमृत दोनमधून या योजनेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे, असेही आमादर महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
केंद्रीय जलशक्ती मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी प्राधान्यक्रमाने मंजुरी देण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांना सूचना दिल्या होत्या. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सहकार्य केले आहे. नवीन योजना ही आगामी पन्नास वर्षे कोरेगावची वाढत जाणारी लोकसंख्या विचारात घेऊन डिझाईन करण्यात आली आहे. ृष्णा नदीमध्ये गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या बंधार्याजवळ नवीन योजना कार्यान्वित केली जाणार आहे, त्याचबरोबर सध्या अस्तित्वात असलेल्या योजनेच्या जलशुध्दीकरणाचे बळकटीकरण या योजनेतून केले जाणार आहे. योजनेच्या जॅकवेल व पंपहाऊसकडे जाण्यासाठी स्वतंत्र नवीन रस्ता देखील तयार केला जाणार असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
नवीन वॉटर ट्रिटमेंट प्लँट साकारणार
कोरेगावकरांना शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करण्याचा दिलेला शब्द आता प्रत्यक्षात उतरणार आहे. नवीन पाणी योजना ही अत्याधुनिक असून, देशातील मोठमोठ्या शहरात राबविलेल्या योजनांवर ती आधारीत आहे. नवीन वॉटर ट्रिटमेंट प्लँट साकारणार असून, जलशुध्दीकरणासाठी नवीन तंत्रज्ञान आधारित यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. ही योजना इको फें्रडली डिझाईन केली असून, नगरपंचायतीच्या वीज बिलामध्ये मोठ्याप्रमाणावर बचत होणार आहे. वीज बिलांवर होणारा खर्च निम्याहून कमी होणार असून, विकासकामांसाठी व कर्मचार्यांच्या पागारासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होणार आहे, असे नगराध्यक्षा दीपाली बर्गे व उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांनी सांगितले.