महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : मौजे बेलवडे हवेली ता.कराड येथे राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच बेलवडे हवेली विकास सेवा सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक यांचा जाहीर सत्कार समारंभ पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक २०/०५/२०२२ रोजी सायं. ५.०० वा.संपन्न होणार आहे.
सदर कार्यक्रमास सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराजदादा पाटील, युवा येवा नेते मा.जशराज पाटील(बाबा), लोकशाही आघाडी कराडचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), आदरणीय पी.डी.पाटीलसाहेब सहकारी बँकेचे संचालक सागर पाटील(दादा), माजी सभापती प्रणव ताटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ.संगीता साळुंखे(माई), जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.ऋतुजा पाटील- वाठारकर तसेच शासकीय अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक उपस्थित राहणार आहेत.
तरी बेलवडे हवेली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन बेलवडेचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी केले आहे.