कीटकनाशक आणि पोषक तत्वांचे एकत्रित मिश्रण असलेले जगातील पहिले उत्पादन – इमारा
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : सल्फर मिल्स लिमिटेड (एस.एम.एल) यांचे नवीन पेटंट उत्पादन – “इमारा” हे स्थानीक कृषी बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आले आहे. “इमारा” हे जगातील पहिले कीटकनाशक आणि पोषकतत्वांचे रासायनिक मिश्रण असलेले उत्पादन आहे. (WDG) फॉर्म्युलेशनसह – “इमारा” हे कीटकनाशक असुन त्यामध्ये (सल्फर-७०% आणि झिंक ऑक्साईड-१३%) ही पोषकतत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत.
सल्फर मिल्स लिमिटेड (एस.एम.एल) चे व्यवस्थापकीय संचालक बिमल शाह म्हणाले की, भाताच्या पिकाचे २० ते ७० टक्के नुकसान येलो स्टेम बोरर (पिवळ्या खोडकिडा) मुळे होते. एस.एम.एल. च्या मुंबई येथील अत्याधुनिक संशोधन केंद्रात विकसित केलेले – “इमारा” हे स्टेम बोररचे प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उत्कृष्ट कार्यक्षमतेचे उत्पादन आहे. “इमारा” हे पीक संरक्षण आणि माती मधील पोषक घटक देणारी एक अनोखी संकल्पना आहे.वापरण्यास सुलभ “इमारा” हे भात लावणीनंतर १५ ते २० दिवसांत किंवा थेट प्रेरणीनंतर २५ ते ३० दिवसांमध्ये चार किलो प्रति एकर या प्रमाणात फवारणी केल्याने पिकांची प्रतिकारशक्ती विकसित करुन पिवळ्या खोडकिड्यांना नष्ट करता येते. जमिनीतील पोषक तत्वांचा समतोल राखून चांगल्या उत्पादनाचे नियोजन करण्यासाठी “इमारा” फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भाताच्या पिकाला उत्तम प्रतीचे जास्तीत-जास्त उत्पादन मिळते.

सल्फर मिल्स लिमिटेड (मुख्यालय – मुंबई) ही कीटकनाशके, खतांचे उत्पादन आणि विक्रीतील भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. 1960 मध्ये स्थापित, सल्फर मिल्स लिमिटेडची उत्पादने 80 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जातात. आज “इमारा” कडे अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि चीनसह इतर 10 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळावे आणि पिकाच्या संरक्षणासोबत मातीतील पोषक तत्वांचा समतोल राखता यावा या उद्देशाने एस.एम.एल. नेहमीच काम करते.






















