इंडस्ट्रीज मधील कार्यप्रणालीची विद्यार्थ्यांनी अनुभूती घ्यावी – ङाॅ.विक्रम घार्गेगौरीशंकर एम फार्मसी विद्यार्थ्यांची झुवेटस कंपनीला शैक्षणिक भेट लिंब : – औषधनिर्माण शाखेतील उच्चज्ञान घेणार्या विघार्थ्यानी इंडस्ट्रीज मधील घडणाऱ्या घङामोडी व कार्यप्रणालीची अनुभूती घेणे अत्यंत आवश्यक आहे असे मत झुवेटस हेल्थकेअर लिमिटेड पुणे या आंतराष्ट्रीय नामवंत कंपनीचे मॅनेनर ङाॅ. विक्रम घार्गे यांनी व्यक्त केले ते गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल -एज्युकेशन अॅन्ड रिसर्च लिंब विद्यालयातील एम.फार्मसी विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रीजला दिलेल्या शैक्षणिक भेटी प्रसंगी मत व्यक्त केले डॉ विक्रम घार्गे पुढे म्हणाले कि औषध उत्पादित कंपन्यांमध्ये सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी नविण्यपूर्ण औषधांची निर्मिती होत असते याची माहीती होण्यासाठी विद्यार्थ्यानी इंडस्ट्रीजला नियमितपणे भेट देऊन आपले ज्ञान वाढविले पाहीजे .प्राचार्य डॉ अजित कुलकर्णी म्हणाले कि शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांनी औषध उत्पदिक कंपन्यांमधील कामकाज व कार्यक्रमाबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे इंडस्ट्रीज भेटीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचवितो.

. औषधनिर्माण शास्त्र शाखेचे ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना काळानुसार बाजारपेठेतील नविण्यपूर्ण कैशल्ये विकसीत होणे आवश्यक आहे हा दुष्टीकोन ठेवून महाविद्यालयाने इंडस्ट्रीज भेटीचे आयोजन केले होते विद्यार्थ्यांना यामधून येणारे अनुभव त्याच्या भविष्यातील उज्जवल करिअर साठी हि पूरक ठरणार आहेत अशी माहीती उपप्राचार्य डॉ योगेश गुरव प्रा धैर्यशील घाडगे यांनी दिली .
डॉ विक्रम घार्गे समावेन डॉ योगेश गुरव , धैर्यशील घाडगे व एम.फार्मसीचे विघार्थी






















