स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई
सातारा : दिनांक २३/१०/२०२१ रोजी सकाळी ११.०० वा. सुमारास “निर्भया पोलीस चौकी” यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा येथे फिर्यादी पो.कॉ. सुहास जगन्नाथ कदम ब.नं. ३०२ हे कर्तव्यावर हजर असताना, सायन्स कॉलेजचा विद्यार्थी जयराज धनंजय जाधव रा. काशिळ ता. कराड जि. सातारा हा आला व त्यास तीन मुलांनी मारहाण केल्याची तक्रार दिल्याने पो. कॉ. सुहास कदम यांनी त्यातील एकाच्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन त्यास निर्भया पोलीस चौकी येथे येण्यास सांगितले असता, आरोपीने निर्भया पोलीस चौकीमध्ये येवून फिर्यादीस आरेरावीची भाषा वापरुन फिर्यादीच्या वर्दीची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याने त्याबाबत पो.कॉ. सुहास कदम यांनी तक्रार दिली असून सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ९७१/२०२१ भादंवि कलम ३५३,३३२, ५०४, ५०६ प्रमाणे नोंद करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा शासकिय नोकरावरील हल्ल्याचा असल्याने, तसेच महाराष्ट्रामध्ये शासकिय नोकरावर हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याने सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करुन कारवाई करणेच्या सूचना मा. श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अजित बोन्हाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी श्री. किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक श्री. गणेश वाघ स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करण्यात आले होते त्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेवून त्यास ४ तासाचे आत ताब्यात घेवून पुढील कारवाईकरीता सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. समाजातील अशा प्रकारच्या समजाकंटक लोकांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने गुन्हयातील आरोपी याचे विरुध्द जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात पोलीसांच्यावर हल्ले करणाऱ्या लोकांच्याविरुध्द कडक कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे असे श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा यांनी सांगितले आहे. श्री. अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा व श्री. अजित बोऱ्हाडे, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या सूचनाप्रमाणे तसेच श्री. किशोर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, पो.ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, पो.कॉ. रोहित निकम, संकेत निकम यांनी सदरची कारवाई केली असून कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.






















