कराड : सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी संवाद शिबिराचे आयोजन कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते. त्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथजी शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत , गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांचे कराड विमानतळ येथे कराड तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्यांनी स्वागत केले.
यावेळी सातारा जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक, उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, शंकर विर, राजेंद्र माने, शाखाप्रमुख भार्गव शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.