मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते वारुंजी येथे दोन कोटी सोळा लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : नामदेव पाटील (आप्पा) पंचायत समिती सदस्य,यांच्या वाढदिवसानिमित्त “सत्यजित महोत्सव”चे आयोजन यावेळी करण्यात आले होते.भव्य बैलगाडा शर्यत व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वारुंजी पंचक्रोशीत करण्यात आले होते.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी अनेक विकास कामांचे उद्घाटन केले.यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले;की कराड तालुक्यातील वारुंजी हे गाव विकास कामांच्या बाबतीत अग्रेसर आहे.पंचायत समितीचे सदस्य असतील किंवा ग्रामपंचायत असो उत्तम अशा प्रकारे प्रशासन व जनतेचा कारभार चालू आहे.आतापर्यंत खूप विकास कामे झाली आहेत,अजून काही कामांची वर्क ऑर्डर मिळालेली आहे. ती ही पूर्ण होतील.

वारुंजीला कराड ह्या शहराजवळच एकआदर्श गाव म्हणून ओळखले जाते.वारुंजीचे वेगाने शहरीकरन होत आहे.शिवाय कराडमधील लोक शहराला पर्याय म्हणून वारुंजीची निवड करतायेत.उंच ईमारती, कॉम्प्लेक्स,पंच तारांकित हॉटेलसमुळे या गावाला शहरिकरनाचे एक रूप प्राप्त झाले आहे.आज सोसायटी,ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास खूप प्रेरणादायी झाला आहे.
यावेळी उदयसिंह पाटील सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस,मनोहर शिंदे अध्यक्ष कराड दक्षिण कॉंग्रेस कमिटी, ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते.






















