महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सातारा, दि. ४ एप्रिल : कष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतले ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचे बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा, असे आवाहन प्राचार्य श्री विलास वाळवेकर यांनी केले.

पांचगणी येथील शॉलोम इंटरनॅशनल स्कूल येथे १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक निरोप समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य वाळवेकर बोलत होते.
संस्थेचे चेअरमन अजित बिरमाने यांनी प्राचार्य वाळवेकर यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले.
आचार्य श्रीनिवास वाळवेकर आणि संस्था चेअरमन अजित बिरमाने यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
प्राचार्य विचारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वितरण करताना प्राचार्य श्रीनिवास वाळवेकर आणि अजित बिरमाने. (छाया – अनिल गायकवाड)






















