भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांना आणि त्या माध्यमातून संपूर्ण काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी तसेच देशातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी झटणाऱ्या विरोधी पक्षाचा आवाज दडपण्यासाठी केंद्र सरकारने ईडी च्या माध्यमातून जे षडयंत्र चालविले आहे. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण भारतातील ईडी ऑफिससमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहेत. त्याच बरोबर केंद्र शासना तर्फे नव्याने सुरु करित असलेल्या देशातील युवकांचे भविष्य उध्वस्थ करणाऱ्या अश्या “अग्निपथ भरती योजना” च्या विरोधात युवक काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे,आपल्या भागातील मुले मोठ्या संख्येने सैनिक भरती होतात, अग्निपथ योजनेमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरलय देशातील अन्य भागांचा तुलनेत खूप जास्त संवेदनशील भाग आहे आपला. देश सेवेसाठी सगळ्यात जास्त तरुण सैनिक आपल्या भागातून भरती मध्ये सहभागी होतात त्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा निषेध करतो.केंद्र सरकारने हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा नाहीतर युवक काँग्रेस गप्प बसणार नाही.असे वाईचे अध्यक्ष सचिन काटे म्हणाले.

या पार्श्वभूमीवर वाई विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने जयदीप दादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई येथे मशाल मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा वाई विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काटे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला, या मोर्चा साठी सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विहार पावसकर,सारंग वनारसे,रोहित पंडित,वैभव बेस्के,अतुल मोरे,निलेश चव्हाण,रिझवान शेख,सलमान अफगाण,अरबाज शेख,सुनील भागवत तसेच युवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.






















